Vasota Camping & Trekking Event

शिवप्रेमी आणि गड किल्यांची आवड असलेला मी आणि सध्या तसच वेड लागलेला माझा मित्र किरण मांजरेकर आम्ही वेग वेगळे गड सर करण्याचा सपाटाच लावला आहे. साधारण २ वर्षा पासून रेंगाळलेला वासोटा ट्रेक आम्ही मी दुर्ग वेडा सोबत करण्याचा निर्धार केला. बरेच वेळा लोकांच्या तोंडून नाव ऐकलेलेआणि कलावंतीण वर प्रत्येक्षात त्या ग्रुपच काम बघितलेले आम्ही दोघे ही तयार झालो त्या अनुभवाच्या प्रवासासाठी...
साधारण रात्री ८.३० च्या सुमारास कात्रज वरून सुरू झालेला प्रवास आणी ट्रेकच्या प्रथे प्रमाणे चालत आलेला Self Introduction कार्यक्रम चालू झाला, सगळ्यांची नुसती नावं ऐकायची आणि ओळख नाही झाली ट्रेक मध्ये तर वास्तविक जीवनाशी आपला काही संबंध नसल्या सारखी सोडून द्यायची असच चालत आलेल्या परंपरेला छेद देत हा कार्यक्रम आता पर्यंतच्या अनुभवा मधला सगळ्यात वेगळा आणि खूपच Interactive होता आणि तो बनवला अनिकेत आणि तुषार सरांनी. खरतर हीच चाहूल होती मोठ्या अविस्मरणीय अनुभवाची.
सगळे आंधारात खिडकीतून बाहेर बघत असताना, आपल्या लोकांसोबतच गप्पा मारण्यात दंग असतानाच ग्रुपच्या नावाला साजेस असा वेडा लीडर (तुषार सर) गाणी वाजवत सगळ्यांना त्या गाण्याच्या तालावर नाचवन्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले...
पोटपूजा, गप्पागोष्टी, डुलके  घेत  घेत आमही  बेस डेस्टिनेशनला आलो, काळोख्या आंधारात चांदण्या बघत बघत आम्ही बोटीतून राहण्याच्या ठिकाणी पोहचलो. गुलाबी थंडीत सगळेजण शेकोटीचा आनंद घेत होते. तुषार सस्तेच्या कवितांनी सगळ्यांच्या वाह वाह मिळवल्या. खुप उशिर झाल्या मुळे खुप जण Tent मध्ये झोपून गेले त्यानंतर गप्पा मारत असताना एका आदभूत माणसाचं दर्शन घडायला सुरवत झाली... प्रोफेशन ने जरी  क्राइम ब्रांच मध्ये कार्यरत असले तरी इतका  डाउन टू अर्थ माणूस, प्रचंड अनुभवी, सगळ्यांचा ऐकून घेणारा आणि योग्य मार्गदर्शन करणारा असा अवलिया दुसरं कोणी नसुन ट्रेक चा मुख्य लीडर अनिकेत कदम दादा. ह्या आवलिया ने माज्या मनात मोठा प्लॉट विकत घेतला आहे आणि त्या प्लॉट वर आजुन खुप काम बाकी आहे, विनोदाचा भाग सोडला तर मी खुप मोठा फॅन झालोय...
त्यानंतर अगदी २ तासांच्या झोपेनंतर आवाज येण्यास चालू झाले  आपल्याला ट्रेक साठी रेडी होयला मन तयार होत नव्हत त्या ब्लँकेट मधली उब काही मला tent च्या बाहेर पडू देत नव्हती तिला बाजूला करून आखेर तयार होऊन पोटभर चविष्ट पोहे,शिरा आणी खास अनिकेत सरांनी दिलेला कोरा चहा घेउन सगळे गोल करून थांबले. सगळ्यांना ग्रुपचे badges देऊन ट्रेक बदलची महिती अाणि नियमावली सांगून साधरण आम्हा ३० लोकांचा बटवारा  झाला. जवळपास ११ लोकांच एक ग्रुप ड्रीम ११ नावाने तयार झाला आणि त्या लोकांची  एक  बोट आणि राहिलेल्या लोकांची एक बोट असा आमचा प्रवास वासोटा गडा कडे चालू झाला. खुप सारे व्हिडिओ, फोटो काढून आम्ही वासोट्याच्या मुख्य गेटमध्ये प्रवेश केला तिथल्या  औपचारिकता दोन्ही ट्रेक लीडर ने पूर्ण करुन आमचा प्रत्यक्ष ट्रेक चा प्रवास  चालू  झाला...
आमच्या काफिल्यामध्ये काही नॉन महाराष्ट्रीयनपण होते, ८०% लोकांच पहिला ट्रेक होता परंतु योग्य नियोजन, परफेक्ट टाइम ब्रेक्स, गरजेच्या ठिकाणी प्रोहत्सहान देत सगळ्यांनी गड सर केला, मनापासुन सलाम सगळ्या स्ट्राँग मुलींना आणि पहिल्यांदा ट्रेक करणाऱ्या सगळ्यांना. गड सर करताना लागलेली आणि गडावरील ऐतिहासीक वास्तूंची, मंदिरांची, ठिकाणाची अनिकेत सरांनी सखोल माहीती दिली. सर्वांनी आणलेल्या आपल्या पदार्थांचा गोपाळकाला केला. गडावर अनिकेत सरानी इको पॉइंटवर महाराजांचि गर्जना देऊंन इको इफेक्ट एकवला आणि त्या नंतर निखिल ढवळे भावाने महाराजांचि गारद देऊन सर्वांची मने जिंकून उत्साह द्विगुणित केला...

गडावरील परतीचा प्रवास सुरूू झाला तो पर्यंत आनोळखी लोक आपली होऊ लागली होती, पायथ्याला पाण्याच्या ओढ्यात कोणी फ्रेश झाले तर काहींना पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही. एक्झिट गेट पासून पुन्हा २ ग्रुप आपल्या बोटीत बसण्याच्या जोशने निघू लागले आणि तिथेच ड्रीम ११ विरुद्ध नवीन टीम बनण्याचा शंख फुखला गेला. कारण आर्धी टीम आजून एक छोटा जंगल ट्रेकचा अॅडव्हेंचर करत बोट जवळ पोहचली, इतका संघर्ष करून काही उपयोग नाही असं दृश्य समोर पाहिलं आणि बोट चालवणाऱ्या काकान वर सगळ्यांनाच राग आला, आमच्या बोटी भवती असलेल्या बोटी आणि बाजूला प्रचंड मोठं असलेलं झाड आणि ह्या मधून आमची बोट काढणे म्हणजे समुद्रात सेतू बनवण्या सारखेच होते. काकांचा बोट काढण्याचा संघर्ष बघून रागावलेले सगळे महाराजांचे मावळे पेटून उठले, सगळ्यांनी मिळून अतिशय कठीण टास्क टीम बॉण्ड ने पूर्ण केला आणि युद्ध जिंकल्या सारखा आनंद सगळ्यांना झाला आणि तिथेच आपलेपणाही जाणवू लागला.  तुषार सरान समवेत काका ना घेउन #काका ग्रुप तयार झाला.  आपल्याच दुनियेत खूष राहणाऱ्या काकांना पण झालेल्या त्रासाबादल खंत होती म्हणून आमची विनंती स्वीकारुन बोटीतून फिरण्याचे २-३ एक्स्ट्रा राऊंड केले. त्यांच्या घामाने भरलेल्या चेहऱ्यावर पण इतका आनंद ओसंडून वाहत होता की त्यांना पायातून येणाऱ्या रक्ताचे ही भान राहिले नव्हते आमच्या आनंदात ते ही तितकेच आनंदी झाले होते. ह्या आनंदात सगळेच आपले कधी बनून गेले ते समजलेच नाही अगदी वर्षानुवर्ष पासून ओळखतो असा बाँड तयार झाला...
महागड्या हॉटेलच्या जेवनाला ही लाजवेल असे अतिशय चविष्ट व्हेज आणि नॉनव्हेज जेवन करुन सगळे संतुष्ट झाले होते. ड्रीम ११ vs टीम काका सुधाअगदी गुण्या गोविंदाने जेवले. थोडी विश्रांती घेत खऱ्या परतीचा प्रवास चालू झाला. पुन्हा ड्रीम ११ विरुद्ध टीम काका बोट तयार झाल्या आणि दोन्ही बोट मधे आनंद लुटण्याच युद्ध सुरू झालं भले ड्रीम ११ जरी काठावर पहिले पोहचले तरी आनंद लुटण्याच युद्ध माञ टीम काका ने जिंकल हे स्पष्ट झालं.
पुन्हा सर्वांनी गुण्यागोविंदाने सूर्यास्ताचा आनंद लुटला. खरतर घराकडे जायला पाय वळत नव्हते. बसचा प्रवास चालू असला तरी मन आजुन तिकडेच तरळत होते.
साताऱ्यात पेढे घेऊन, चहापाणी उरकून प्रवास शेवटच्या टप्प्यात आला सर्वांनी आपले अनुभव संगितले आणि सर्वजन भावुक ही झाले. काहींना भाषेचा अडथळा असला तरी त्यांना आनंदाच्या vibes मात्र अगदी पोहचत होत्या आणि ह्या सर्व घडामोडीत छोटा परिवार तयार झाल्याचा अनुभव आला. ह्या परिवाराची जबाबदारी परिवाराचे प्रमुख अनिकेत सर आणि तुषार सर ह्यांनी पेल्ली. साताऱ्यात न उतरता पुण्यात येऊन पुन्हा साताऱ्याला जाऊन जबाबदारीचा दाखला देऊन मने जिंकली.
हा नुस्ता ट्रेक नसून अनोळखी माणसे ते आपली माणसे बनवण्याचा , कोऱ्या पाटीवर अनुभवाच अक्षर लिहण्याचा, कोणत्याही परिस्थितीत आनंदी जगण्याचा, माणुसकी जपण्याचा, हार न मानता प्रयत्न करत राहण्याचा अस बरच काही शिकण्याचा प्रवास होता...

मी खरोखर "मि दुर्गवेडा टीम",अनिकेत सर, तुषार सर आणि सर्वांचाच मनापसुन शतश: आभारी आहे...
 

- तुमचाच
सचिन गिलबिले